तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा घेतला. त्यानंतर तालिबान्यांनी तीन आठवड्यांनी त्यांच्या सरकारची घोषणा केली आहे. नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी दिली आहे.तालिबानने अमेरिकेच्या अतिरेकी यादीत मोस्ट वॉन्टेड असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीला त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री बनवले आहे. हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
गुगलने अफगाणिस्तानच्या माजी सरकारची सर्व ईमेल खाती लॉक केली आहेत. आता तालिबानी दहशतवाद्यांना या खात्यांमध्ये उपस्थित असलेली माहिती मिळू शकणार नाही.घनी सरकारच्या काळात अफगाणिस्तानचे अनेक देशांशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. भारताशिवाय, यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनचा समावेश होता. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान ही डिजिटल कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
तालिबानने कोणत्याही समारंभाशिवाय सरकारची घोषणा केली आहे. या टीममध्ये एकही महिला नाही.अशी आहे तालिबानच्या अंतरिम सरकारची यादी –
पंतप्रधान – मुल्ला मोहम्मद हसन अखूंद, उपपंतप्रधान 1 – मुल्ला बरादर, उपपंतप्रधान 2 – अब्दुल सलाम हनाफी
गृहमंत्री – सिराजुद्दीन हक्कानी,संरक्षण मंत्री – मोहम्मद याकोब मुजाहिद,अर्थमंत्री – मुल्ला हिदायतुल्ला बदरी,
परराष्ट्र मंत्री – मौलवी अमीर खान मुतक्की, शिक्षण मंत्री – शेख मौलवी नूरुल्ला मुनीर,उच्च शिक्षण मंत्री – अब्दुल बाकी हक्कानी,न्याय मंत्री – मौलवी अब्दुल हकीम शरिया
ग्रामविकास मंत्री – युनूस अखुंदजादा, शरणार्थी व्यवहार मंत्री – खलीलुर रहमान हक्कानी, लोक कल्याण मंत्री – मुल्ला अब्दुल मनन ओमारी
दळणवळण मंत्री – नजीबुल्लाह हक्कानी,खाण आणि पेट्रोलियम मंत्री – मुल्ला मोहम्मद आसा अखुंद,
मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी – मुल्ला अब्दुल लतीफ मंसौर,हवाई वाहतूक मंत्री – हमीदुल्ला अखुंदजादा,माहिती आणि संस्कृती मंत्री – मुल्ला खैरुल्ला खैरखवाह
अर्थमंत्री – कारी दिन मोहम्मद हनी,हज आणि औकाफ मंत्री – मौलवी नूर मोहम्मद साकीब
सीमा आणि आदिवासी व्यवहार मंत्री – नूरुल्ला नूरी
उपपरराष्ट्र मंत्री – शेर मोहम्मद स्टेनकझाई,उपअर्थमंत्री – मुल्ला मोहम्मद फाजील अखुंद,संस्कृती मंत्रालयाचे उपमंत्री – जबीउल्लाह मुजाहिद
संरक्षण मंत्रालयातील लष्करप्रमुख – कारी फसिहुद्दीन,लष्करप्रमुख – मुल्ला फजल अखुंद,गुप्तचर महासंचालक – अब्दुल हक वासिक,गुप्तचर विभागाचे उपप्रमुख – मुल्ला ताज मीर जवाद,राष्ट्रीय सुरक्षा संचालनालय (एनडीएस) प्रमुख – मुल्ला अब्दुल हक वासिक
अफगाणिस्तान बँकेचे प्रमुख – हाजी मोहम्मद एड्रिस,कारभाराचे प्रशासन – मौलवी अहमद जान अहमदी,चीफ ऑफ स्टाफ – फसिहुद्दीन