अभिनेता यशोमान आपटे याने ठाण्यात त्याचं कॅप्टन कूल नावाचं सुंदर असं कॅफे सुरु केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी नुकतीच या कॅफेला भेट दिली आहे. शेक्स, आईस्क्रीम आणि इतर थंड पदार्थ अशी या कॅफेची खासियत आहे. फुलपाखरु मालिकेमुळे अभिनेता यशोमान आपटे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनेक सेलिब्रिटीजप्रमाणेच यशोमाननेही कॅफे सुरु करत या खाण्यापिण्याच्या व्यवसायात उडी मारली आहे.