काहे दिया परदेसची अभिनेत्री आणि मराठी सिनेसृष्टीतील सायली संजीव हिच्या वडिलांचे 30 नोव्हेंबर रोजी निधन झाले. सायलीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सायलीचे वडील हे आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
सायलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं.”
तिने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी लिहिल्या आहेत. ती म्हणाली, ‘दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.., शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.., आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर….”