अमेरिकेत प्राथमिक शाळा उघडल्यानंतर लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. टेनेसी आणि टेक्सासमधील मुलांचे आयसीयू भरले आहेत. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कमध्येही मुलांची प्रकरणे वाढत आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच एवढी लहान मुले एकाच वेळी रुग्णालयांमध्ये गंभीर आजाराने भरती झाली आहेत.ही मुले दोन महिने ते 12 वर्षे या वयोगटातील आहेत.आतापर्यंत साथीच्या आजारापासून 400 मुलांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या मते, अमेरिकेत गेल्या 7 दिवसात 1.80 लाख मुले संक्रमित आढळली आहेत. देशातील एक लाख मुलांपैकी 6,100 मुलांना संसर्ग होत आहे.काही मुले श्वास घेण्यासही असमर्थ आहेत. त्याना सतत ऑक्सिजन दिला जात आहे. काहीना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.