आरोग्य विभागाच्या पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल-आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे

0
103

आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदभरतीची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणारी परीक्षा रद्द झाली होती.परीक्षेच्या एक दिवस आधीच ही परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच आर्थिक फटका देखील बसला होता. आता ही रद्द झालेली पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here