इंडिया पोस्ट पेमेंट बँकेव्दारे पोस्टमन मार्फत हयातीचा दाखला अपडेट करण्याचे पेन्शनरांना आवाहन

0
44

सिंधुदुर्ग: पेन्शनरांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेव्दारे पोस्टमन मार्फत हयातीचा दाखला (Digital Life Certificate) अपडेट केला जातो, त्यासाठी पेन्शनरांच्या हाताच्या बोटांच्या ठस्यांची (Biometric) ची आवश्यकता असते. पोस्टमन घरी येऊन पेन्शनरांचे हयातीचा दाखला Life Certificate अपडेट करतात. त्यासाठी नाममात्र शुल्क ७० रुपये घेतले जाते. हयातीचा दाखला (Life Certificate )घरपोच अपडेट होत असल्यामुळे पेन्शनरांना त्यांच्या पेन्शन ऑफिसला जाण्याची गरज नाही . तरी जिल्हयातील सर्व पेन्शनरांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here