उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उडी

0
125

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उडी मारली आहे. या निवडणुकीत शिवसेना एकूण 403 जागा म्हणजेच सगळ्या जागावर लढणार आहे.शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही.या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात.

शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात.शिवसेनेने एक पत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये उ.प्र सरकार ब्राह्मणांविरोधात गैरव्यवहार करत आहे. राज्यात आरोग्य व्यवस्था फारच वाईट आहे. करोना रुग्णांचे मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सामान उपलब्ध होत नव्हतं . बंद असणाऱ्या शाळाही राज्यामधील विद्यार्थ्यांकडून हव्या तशा पद्धतीने फी घेताना दिसत आहेत. सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळामधील फी १५ टक्क्यांनी कमी करण्यात आलेली नाही.उ.प्र.मध्ये बेरोजगारी आणि महागाई आहे.त्यामुळे तरुण मुलं राज्य सोडून जात आहेत असे आरोप केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here