एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.ही वाढ फक्त व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे.घरगुती गॅस एलपीजी सिलेंडरसाठी ही वाढ करण्यात आली नाही त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.मुंबईमध्ये 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,950 रुपयांवर पोहचला आहे.गेल्या महिन्यामध्ये सबसीडी फ्री 14.2 किलो सिलेंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.