ओबीसी आरक्षणासाठी रस्ता रोको मध्ये काँग्रेसही सहभागी होणार !
सिंधुदूर्ग-अभिमन्यु वेंगुर्लेकर
ओबीसी समाजाचे आरक्षणा विरुद्ध सर्व राजकीय पक्ष आहेत असे सरसकट अविवेकी विधान बातमीत आले आहे ते पुर्णतः हा असत्य असुन काँग्रेस ही ओबीसी यांच्या राजकीय आरक्षणा बाबत जात , समाज , धर्म जनगणने बाबत ठाम असुन राजकीय आरक्षण व जाती निहाय जनगणना झालीच पाहीजे असे ठाम विधान रत्नागिरी जिल्हा काँग्रेस च्या वतीने अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष, प्रवक्ते आणि संस्थापक अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे .
या बाबत ते पुढे म्हणाले की जेंव्हा जेंव्हा ओबीसी समाज सर्वांच्या हक्कासाठी संघर्ष करेल तेंव्हा तेंव्हा काँग्रेस पक्ष हा त्यांच्या बरोबर न्याय हक्का साठी आरक्षण आणि जाती निहाय जनगणने साठी खांद्याला खांदा लावून संघर्षात ऊतरेल तरी ओबीसी आरक्षणा बाबतच नव्हे तर ओबीसी , एस टी , एन टी , मराठा , मुस्लीम , धनगर , लिंगायत , कुणबी , आर्थिक दृष्टा दुर्बल यांच्या व इतर समाजांच्या न्याय आरक्षणा विरोधात काँग्रेस पक्ष नाही व असणार नाही तरी ओबीसी नेत्यांनी काँग्रेसला आरक्षण विरोधी आहे असे विधान करू नये असे अशोकराव जाधव यांनी सांगितले खरे तर हा लढा केंद्र सरकार विरोधात ज्या केंद्र सरकारने जाती निहाय डाटा देणेस विरोध केला त्या भाजपा विरोधात असला पाहीजे असे काँग्रेसचे मत आहे असे अशोकराव जाधव यांनी सांगितले .