मुंबई – जगभरात कोरोनाच्या ओमोक्रॉन या नव्या व्हेरिएंटने दहशत निर्माण केली असतानाच भारतातही ओमिक्रोनचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या संशयित रुग्णाची संख्या २९ झाली असून एकट्या मुंबईत ओमिक्रॉनचे १० संशयित रुग्ण आहेत तर इतर 18 जण हे मुंबई, पुणे, ठाणे या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. ओमिक्रॉनचे हे २९ संशयित रुग्ण आंतरराष्ट्रीय विमानाने १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबईत आले आहेत. ९ परदेशी नागरिकांसह १० जणांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कर्नाटकातील दोन कोरोना ओमिक्रॉन रुग्णांपैकी एक ६६ वर्षांचा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतुन आला असून दुसरा ओमिक्रॉन रुग्णांने कोणताही प्रवास केलेला नाही. त्याच्या संपर्कातील पाच जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महाराष्ट्रातील या २८ जणांचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे या गजबजाटीच्या शहरांमध्ये संशयित कोरोना ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. संशयित ओमिक्रॉन रुग्णांची संख्या मीरा भाईंदर १, मुंबई १0, कल्याण १, पुणे १, पिंपरी २, सातारा १० अशी आहे. हे सर्व संशयित रुग्ण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले २५ जण हे परदेशी प्रवास करुन आले आहेत, तर तिघे जण हे त्यांच्या संपर्कातील आहेत. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची ओमिक्रॉनची जिनोम चाचणीही करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
रशियाहून कुटुंबासह परतलेल्या अंबरनाथमधील सात वर्षाची एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ७ वर्षाची बालिका आई वडिलांसह रशियाला फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परत आले. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्याने टेस्ट केली असता ती कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले. मुलीचे वडील निगेटिव्ह असून तिच्या आईच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आली असल्याचे दिसून आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी आज लॅबला पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन झाले असून त्यांची इमारत सील करणार असल्याची माहिती पालिकेनी दिली आहे.
30 देशांमध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या विषाणूची संसर्गक्षमता वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे. पण आतापर्यंत या विषाणूने कुणीही गंभीर आजारी झाल्याच दिसून आलेलं नाही. त्यामुळे कोविडचे नियम म्हणजे तोंडाला मास्क लावणे,जास्त जर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,यासारखे वर्तन आपण शिस्त म्हणून अंगी बाळगने आवश्यक असून, कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशील्ड यांचे सर्वांनी लसीकरण करावे. कारण शरीरातील तयार झालेल्या अँटिबॉडीजना हा कोरोनाचा व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका.त्याशिवाय आतापर्यंत ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य असल्याचे दिसून येत आहे. आहेत. मात्र दक्षता घेणे आवश्यक असून कोरोनाच्या सर्व नियमांचे जनतेने पालन करावे असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे