स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिनेत्री कंगना राणावतचा कुडाळ तालुका शिवसेनेने निषेध करीत, केंद्र सरकारने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत मागे घ्यावा, अशी मागणी केली.
नुकताच केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र तिने स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले असून, तिच्या निषेधार्थ शनिवारी कुडाळ शिवसेना शाखेसमोर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी आंदोलन छेडत अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला. स्वातंत्र्याचा अपमान करणा-या कंगना राणावतचा निषेध असो, कंगनाला अटक झालीच पाहिजे, शिवसेना जिंदाबाद, व केंद्र सरकार व कंगना राणावत विरोधात जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, अतुल बंगे, रूपेश पावसकर, सुशील चिंदरकर, पिंगुळी सरपंच सौ.निर्मला पालकर, मिलिंद नाईक, संदीप म्हाडेश्वर, गंगाराम सडवेलकर, कृष्णा धुरी, चेतन पडते, राजू गवंडे, मंजू फडके, गोट्या चव्हाण आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.