केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गेल्या महिन्यात वाढ करण्यात आली होती. महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून थेट 28 टक्के झाला आहे. सोबतच HRA देखील 24 टक्क्यांवरून वाढून 27 टक्के करण्यात आला आहे.
जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात वाढ होण अपेक्षीत आहे. महागाई भत्त्यात आणकी 3 टक्क्यांनं वाढ होण्याची शक्यता आहे. AICPI च्या जून 2021 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के होईल. याचा अर्थ असा की, महागाई भत्त्यात आणखी 3 टक्के वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
कर्मचारी संघटनेकडून होणारी मागणी लक्षात घेता, जुलै 2021 साठी महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत घोषणा याच महिन्यात होईल. सरकार याचं वितरण ऑक्टोबरच्या वेतनात करू शकेल. मात्र, सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा झाल्यास सरकारला जुलैपासून आतापर्यंत एरियर द्यावा लागेल.