केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

0
95

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरकारने त्यांना आता Z सुरक्षा प्रदान केली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणेंना देण्यात आलेल्या नवीन सुरक्षेच्या अंतर्गत CISF चे 6 ते 7 सशस्त्र जवान नेहमीच त्यांच्यासोबत असतील.इतर पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा 22 जण नारायण राणे यांच्या सुरक्षेत 24 तास तैनात राहतील. याबरोबरच त्यांच्यासोबत रुग्णवाहिकेसह 5 पेक्षा अधिक गाड्यांचा ताफा आणि एका बुलेटप्रूफ कारचा सुद्धा समावेश राहील.केंद्रीय तपास संस्थांना नारायण राणे यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सीआयएसएफकडून इतर महत्वाच्या व्यक्तींना सुद्धा संरक्षण दिले जाते. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here