भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घातलेले थैमान आपण सारे पाहत आहोतच. या लाटेसमोर देशाची आरोग्यव्यवस्थाही अपुरी पडली आहे. त्यातच केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत कोरोनाची तिसरी लाटही येईल असा सावधतेचा इशारा दिला आहे.तसेच त्यांनी कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर असल्याचेही म्हंटले आहे.
तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे असेही ते म्हणालेकेंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी भारतात तिसरी लाट येण्याचा वर्तविला अंदाज. या तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्राकडून गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु आहे. यात न थांबता आरोग्य सुविधा वाढविण्याच्या यंत्रणेला सूचना आल्या आहेत, कोरोना रुग्णसंख्या किंचित कमी येताना दिसत असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही असेही मुख्यमंत्र्यांत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.