कोल्हापूर शहरातील करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने लॉकडाउनचे निर्बंध कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय काल प्रशासनाने घेतला होता.करोना संभाव्य तिसरी लाट आणि करोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका यामुळे राज्यात आजपासून निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. दुकाने सायंकाळी ४ पर्यंतच खुली राहतील तर सायंकळी ५ नंतर विनाकारण बाहेर फिरण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.सरकारी आदेशाचे राज्यात सर्वत्र कठोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
रस्त्यावर होणारी गर्दी, लोकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, रुग्णसंख्येत झालेली वाढ, उत्परिवर्तित विषाणूचे आढळलेले रुग्ण यामुळेच निर्बंध पुन्हा कठोर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.कोल्हापूर शहरात गेले दोन आठवडे व्यापारी व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी लढा देत आहेत.गेले दोन दिवस व्यापाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते.त्यामध्ये काही झाले तरी सोमवारपासून व्यापार सुरू केला जाणारच असा निर्धार व्यापाऱ्यांनी केला होता. या मागणीसाठी आज व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.