वकील प्रदीप कुमार यादव यांनी कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वकिलांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.यादव यांनी याचिकेत म्हटले होते की, 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या त्या वकिलांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, ज्यांनी कोरोना संसर्गामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपला जीव गमावला आहे.
कोर्टाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला सांगितले की, तुमचे जीवन इतरांच्या जीवांपेक्षा जास्त मौल्यवान नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला वेगळी वागणूक देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने वकिलाला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.कोविडमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. वकीलाचे आयुष्य इतरांपेक्षा अधिक मौल्यवान असू शकत नाही. ज्या लोकांनी कोरोनामुळे प्राण गगमावले आहे, त्या सर्व लोकांच्या भरपाईबद्दल आम्ही आधीच बोललो आहोत.समाजातील इतर लोक महत्त्वाचे नाहीत का? ही याचिका कट-कॉपी-पेस्ट पद्धतीने करण्यात आली आहे.