स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन! क्रांतिज्योति सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान चिरंतन असे आहे. सावित्रीबाईंच्या कर्तृत्वामुळेच स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला झाला. या शिक्षित पिढ्यांतून आलेल्या अनेक माता-भगिनी, विदुषींनी आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा आणि अभिमानास्पद असा वाटा उचलला आहे. आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.