अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले आहे.आर्यन आणि अरबाज मर्चंटने एनसीबीच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. किल्ला कोर्टाने शुक्रवारी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर आता त्याचे वकील सत्र न्यायालयात जामिनासाठी अपील करणार आहेत
या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली असून अनेक सेलिब्रिटी शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. हृतिक रोशन, सुझान खान, रवीना टंडन यांच्यानंतर आता जॉनी लिव्हर, निर्माते अभिषेक कपूर, आणि सोनू सूद यांनीही शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पाठिंबा दिला आहे.तापसी पन्नूने स्टार किड असण्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटे देखील आहेत. प्रसिद्धीबरोबर त्या गोष्टीची जबाबदारी देखील येते. एक पब्लिक फिगर म्हणून त्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटेदेखील हे आहेतच. आणि हे फायदे आणि तोटे केवळ पब्लिक फिगरपर्यंतच मर्यादीत राहात नाहीत. तर कुटुंबालादेखील त्याचा सामना करावा लागतो. स्टारडमचे जर तुम्ही फायदे उपभोगत असाल, तर त्याचे दुष्परिणाम देखील असतील याची काळजी घेतली पाहिजे म्हटले आहे.