गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी सभा घेऊन दिल्या मार्गदर्शक सूचना

0
91

रत्नागिरी:

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील सडामिऱ्या व शिरगाव येथे पो.नि. सासणे यांनी SDPO श्री. वाघमारे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेतली व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील मेर्वी व जांभुळआड आणि पावस येथे पो.नि. गावित यांनी गणेशोत्सव निमित्त नागरिकांची बैठक घेतली व घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

राजापूर पोलीस ठाणे येथे पो.नि. परबकर यांनी गणेशोत्सव मंडळांची व ग्रामस्थांची बैठक घेतली व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या.नाटे पोलीस ठाणे येथे सपोनि.पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली व कोरोनच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करत आपले सण साजरे केल्याने स्वतःची,आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करणे आवश्यक असून त्यामध्ये देशाचे थांबलेले अर्थचक्र चालण्यासमदत होणार असल्याचेही यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here