गोवा राज्याचा शेवटॊ (मुलेट) माशाला जिवाणूजन्य बुरशीचा संसर्ग

0
93

गोवा राज्याचा शेवटॊ (मुलेट) माशाला जिवाणूजन्य बुरशीचा संसर्ग (Epizotic Ulcerative Syndrom)EUS झाल्याचे आढळून आले आहे.या बुरशीचे शास्त्रीय नाव असून यामध्ये माशाच्या त्वचेला जखमा झाल्याचे आढळून आले आहे.या जखमा आधीही दिसून आल्या होत्या,पण यावर संशोधनपर उपचार न झाल्याने आता या आजाराची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

हा आजार माणसाच्या विष्टेशी संसर्ग आल्यामुळे होत असून यामध्ये सुडोमोनास नावाच्या बुरशीमुळे माशाच्या तोंडाला,कल्ल्यांना आणि त्वचेला त्याचा परिणाम होतो असे गोव्याच्या विश्वविद्यालयातील एका प्राध्यापकांनी सांगितले.हा आजार पावसाळ्यात वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने शेतातील फवारण्यात येणारी रसायने ,आणि इतर घाण वाहत जाते त्यामुळे पावसाळ्यात या बुरशीजन्य आजार जास्त प्रमाणात आढळून येतो असेही ते म्हणले.

माशांचा हाच त्वचारोग जवळच्याच कोळंबी पालन शेतीमध्येही दिसून आला आहे असेही ते म्हणाले.यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here