गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमिता बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्याला मोदींचा पूर्ण पाठींबा आणि राज्याचे एक वेगळे स्थान असल्याचे सांगितले. गेले सात वर्ष गोव्याला नरेंद्र मोदींचे एक सुंदर पाठबळ मिळाले आहे.
मोदीजींनी गोव्याचे रस्ते, सार्वजनिक इमारती त्याशिवाय अनेक जनहित योजना यासाठी अनेक प्रकारे सहकार्य केले.मोदीजींची दूरदृष्टीने आखलेली धोरणे आणि त्यावर घेतलेले अविरत श्रम यामुळे गरीब,महिला,शेतकरी,दलित याबरोबरच हजारो जणांचे जीवनमान सुधारले आहे.
फक्त गोवाच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात भाजप वीस दिवसांसाठी ‘सेवा और समर्पण अभियान’ राबविणार आहे .हा अभियान कालावधी १७ सप्टेंबर ते ओक्टोम्बर ७ पर्यंत घेण्यात येणार आहे.या अभियानाची कल्पना म्हणजे आतापर्यंत अनेक योजनांमुळे सामान्यजनांच्या आयुष्यात घडलेला बदल आणि त्याब्ब्दल त्यांच्याकडून जनजागृती करणे हा आहे असेही ते म्हणाले .