गोवा- ‘रोबोरेक्स गोवा’ या गोव्याच्या टीमने “जागतिक रोबोट” ऑलंम्पियाडमध्ये ११ वा क्रमांक मिळविला आहे. या गोव्याच्या टीममध्ये अनय नाईक (वय १२),शौनक हेडे (वय ११) आणि प्रणय काकोडकर (वय १३ ) यांनीआज गोव्याच्या मानात राष्ट्रीय स्पर्धेसाठी रोबोट बनवून 11 वा क्रमांक पटकावत अभिमानाचा तुरा खोचला आहे.
संपूर्ण गोव्यातून ‘रोबोरेक्स गोवा’ यानीच या स्पर्धेत भाग घेतला होता. हा रोबोट बनविताना त्यांनी ५००० ब्लॉक्सचे कोड बनविले होत .त्याशिवाय हे कोड बनवितांना त्यांनी अविश्रांत श्रम घेतले असेही सांगितले. पण निकाल ऐकल्यानंतर या श्रमांचे चीज झाले असे या मुलांनी म्हंटले आहे.
WRO या रोबोट स्पर्धामुळे जगभरातील नवीन पिढीच्या कल्पकतेला,प्रगल्भतेला वाव मिळतो. त्यामुळे त्यांच्या विचारांना गती मिळते आणि आनंदही मिळतो. या स्पर्धेचा विषय हा ‘पार्क आणि चार्ज ‘असा होता. यामध्ये मुलांना रोबोट बनविताना तो गाड्यांचे पार्किंग आणि इलेक्ट्रिक चार्जिंग करू शकेल अशी संकल्पना बनवायची होती. हा रोबोट बनविताना या टीमला आर्या खेडेकर याचे मार्गदर्शन लाभले. या संपूर्ण प्रोजेक्टचे कोडींग या मुलांच्या टीमने स्वतः केले असेही त्या म्हणाल्या.