गोवा विमानताळावर केरळ मधून येणाऱ्या प्रवाश्यांची नोंदणी बंधनकारक

0
79

गोवा सरकारने गोवा आंतराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व विमानांना केरळहून येणाऱ्या सर्व प्रवाशांची नोंद बंधनकारक असल्याचे जाहीर केले आहे.अशा प्रवाश्यांना ५ दिवसाचे विलगीकरण बंधनकारक असल्याचेही सांगितले आहे.त्याशिवाय केरळहून येणाऱ्या प्रवाश्यांनीही याबद्दल सहकार्य करावे असेही जाहीर केले आहे.कोविड १९ आणि त्याचा वेगाने होणार संसर्ग याना अटकाव व्हावा यासाठी गोवा सरकारने पाच दिवसांचे विलगीकरण करण्याचे ठरविले आहे.महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील कोविड १९ ची रुग्णसंख्या पाहता हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले

केरळ मधुन येणारे विद्यार्थी तसेच नोकरीनिमित्ताने येणाऱ्या लोकांना संस्थात्मक विलीगीकरणाची सोय करण्यात आली असून पर्यटक आणि नागरिकांनी आपल्या घरातच पाच दिवसाचे विलगीकरण महत्वाचे आहे.गोव्यामध्ये केरळमधून येणारे लोक कमी असून ते दिल्ली,मुंबई,आंध्र याठिकाणांहून येत असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here