अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे 1000 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन करण्यात आले.या कार्यक्रमाला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निर्मात्यांनी हा प्रवास एका व्हिडिओद्वारे प्रेक्षकांसोबत शेअर केला.कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र आल्या होत्या. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेली नंदा यावेळी शोमध्ये खास पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या.
बिग बींच्या पत्नी जया बच्चन देखील या खास प्रसंगी ऑनलाइन हजर होत्या.अमिताभ बच्चन यांनी बिग बींनी अनेक रंजक किस्सेही सांगितले. या शोने यशाचे अनेक नवीन विक्रम बनवले. कार्यक्रमाला मिळालेले हे यश पाहून अमिताभ बच्चनही भावूक झाले. मला कुणीही चित्रपटात काम देत नव्हते. मी खूप आर्थिक अडचणीत अडकलो होतो. त्यावेळी मला या शोमध्ये काम मिळाले. मला अनेकांनी मला तसे करु नका. पण आज मागे वळून पाहणं य शोने मला खूप काही दिला आहे असेही त्यांनी सांगितले.