जन आशीर्वाद यात्रेत चेन चोरणारा कणकवली पोलिसांच्या ताब्यात

0
56
चोरट्याने हातोहात लांबवली २३ हजार ५०० ची रोकड
चोरट्याने हातोहात लांबवली २३ हजार ५०० ची रोकड

सिंधुदुर्ग :अभिमन्यू वेंगुर्लेकर.

जन आशीर्वाद यात्रेत 4 जणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन अज्ञाताने लांबवाणार्‍या संशयिताला पोलिसांनी कणकवलीतून ताब्यात घेतले.
रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.चेन चोरीची ही घटना शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 11 ते 12.30 वा. सुमारास मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली होती.

बाळू तुळशीराम जाधव (28,मुळ रा.बिड) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत नगरसेवक सुशांत अभिमन्यू चवंडे (44, रा.चवंडेवठार , रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी जन आशीर्वाद यात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गर्दीचा फायदा उठवत अज्ञाताने सुशांत चवंडे आणि अन्य तिघांच्या गळ्यातीन सोन्याच्या चेन लांबवल्या होत्या.याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार देताच त्यांनी तपासची चक्रे फिरवून संशयिताला कणकवली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here