अफगाणिस्तान: अफगाणिस्तानमध्ये तालीबान्यांनी सरकार स्थापन केल्यानंतर जगभरचे लक्ष वेधले होते.अमेरिकेने आपले लष्कर मागे घेतल्यांनंतर तालिबान्यांच्या भीतीने अनेक लोकांनी तिथून पळ काढला होता.जे नागरिक तिथेच राहिले त्यांना बाहेर पडण्यास दुसरे कोणतेही पर्याय नव्हते.स्त्रियांना बुरखा सक्ती,नोकरी न करणे,एकटे घराबाहेर न पडणे यासारखे अनेक नियम लादले गेले. त्यातच लष्कर काढून घेतल्यांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातीत महिलांच्या शिक्षणासाठी देत असलेला निधीही बंद केला .
पण आता तालिबान्यांचे सूर बदलत आहेत. अफगाणचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, त्यांचा जुना शत्रू अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांसोबत मैत्रिपूर्ण नाते असावे असे वाटते आहे. सध्या अफगाणी लोक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. जागतिक बांधवांनी मदतीसाठी पुढे यायला हवे.आमचे नवे सरकार अफगाणिस्तानात महिलांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. महिलांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे आम्हाला अमेरिकेने ७५ हजार कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर जारी केला जावा.
संपूर्ण अफगाणिस्तानवर असे निर्बंध लादून काहीच मिळणार नाही. मुत्ताकी म्हणाले की, यावेळचे तालिबान राज पूर्वसारखे नाही. आम्ही अनेक बदल केले आहेत. आज १२ वीत शिकत असलेल्या मुली देशातील १० प्रांतांतील शाळांत जात आहेत. तालीबान सरकारने सत्ता काबीज केल्यानंतर बदल्याच्या भावनेतून कोणतीच कारवाई केली नाही. पण सत्ता मिळाल्यानंतर काही चुका मात्र केल्याचे त्यांनी मान्य केले.