जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता

0
87

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.

अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे. नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे.https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर ई- पाससाठी अर्ज करु शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here