दुरदर्शन असताना नवीन नवीन चॅनेल्स येत गेली त्यांचा भपका,नवनवीन कार्यक्रम बघताना सर्वच दूरदर्शनला विसरून गेले. आता प्रत्येकालाच प्रायव्हेट कंपन्यांच्या कार्यक्रमांची सवय लागली आहे. त्यातच आता 1 डिसेंबरपासून टीव्ही बघणे महाग होणार आहे कारण 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत.
ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या बुकेत देण्यात येणाऱ्या चॅनेलचे मासिक दर आधी किमान 19 रुपये निश्चित करण्यात आले होते, परंतु ट्रायच्या नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये ते किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले आहे. देशातील केवळ ‘7% टीव्ही व्युअर्स अ’ ला कार्ट तत्त्वावर चॅनेलची सदस्यता घेतात. उर्वरित 93% संपूर्ण बुके सब्सक्राइब करतात. या स्थितीत चॅनल्सना त्यांचे बहुतेक चॅनेल फक्त 12 रुपयांमध्ये देणे अत्यंत तोट्याचे ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी, नेटवर्कने काही लोकप्रिय वाहिन्या बुकेतून काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा विचार केला आहे. यामध्ये क्रीडा, प्रादेशिक आणि सामान्य मनोरंजन श्रेणीतील अनेक वाहिन्यांचा समावेश आहे.
देशातील आघाडीचे ब्रॉडकास्टिंग नेटवर्क वायाकॉम, झी, स्टार आणि सोनीने काही चॅनल्सनी त्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढत आहेत. हा आदेश कायम ठेवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, परंतु त्यावर त्वरित स्थगिती आली नाही. 30 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.