तुळसुली तर्फ माणगाव येथे सार्वजनिक विहिरीचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

0
88

आमदार फंडातून ६ लाख रु. निधीतून विहिरीचे काम पूर्ण,ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर

 प्रतिनिधी पांडुशेठ साठम     

आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून तुळसुली तर्फे माणगाव  मांजरेकरवाडी येथील  सार्वजनिक विहिरीसाठी ६ लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. या निधीतून सदर  विहिरीचे काम पूर्ण झाले असून आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत फीत कापून विहिरीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी गावातील विकास कामांचा आढावा घेत नवीन मंजूर कामांची माहिती दिली. तसेच उर्वरित विकास कामे येत्या काळात मार्गी लावणार असल्याचे सांगितले. 

     या विहिरीमुळे मांजरेकरवाडी मधील  ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख गुरुनाथ सडवेलकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, सरपंच सुचिता तुळसुळकर, उपसरपंच विजय वारंग, आजगावकर गुरुजी, बाबा वारंग, जनार्दन सावंत, एकनाथ सावंत, के. के.वारंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here