महाराष्ट्रात कोरोनाच्या घातलेल्या निर्बंधांवरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर खूप टीका होत आहे. जन्माष्टमीच्या दहीहंडीवरील निर्बंधांचा विरोध करत मनसेने मुंबई, ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न केला. ‘लढाई करोनाच्या विरोधात हवी, पण विरोधकांना मूर्खपणाचं फुरसं चावल्यामुळं त्यांची लढाई सरकारविरोधात आहे. अर्थात विरोधकांना फुरसं चावलं म्हणून सरकारनं स्वतःचा तोल ढळू देता कामा नये. कारण राज्यातील कोट्यवधी लोकांच्या जिवाचा विचार करून सरकारला पावले उचलायची आहेत,’ असे शिवसेनेने म्हटले.
केंद्र सरकारनेच राज्य सरकारला ‘कोरोनाची तिसरी लाट जास्त धोकादायक आहे. दहीहंडी व गणेशोत्सवात सावधानता बाळगा, असे लेखी’ कळवल आहे.आता तुम्ही दिल्लीतल्या तुमच्या माय-बापांचेही ऐकणार नाहीत का? महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
दोन दहीहंड्या फोडून कोरोना पळत असेल तर सर्वोच्च न्यायालायने नेमलेल्या टास्क फोर्सने त्याचाही विचार करावा. केंद्र सरकारने निर्बधांबाबत पाठवलेल्या खलित्याची होळी करायची की, सुरनळी,त्यावरही विरोधकांकडून मार्गदर्शन व्हावे. असेही शिवसेनेने म्हटले आहे.
महाराष्ट्रातून शिष्टमंडळ घेऊन दिल्लीस जावे व पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटावे. त्यांच्या दारात मंदिर उघडण्यासाठी जागर करावा, पण यांची बोंबाबोंब महाराष्ट्रात सुरु आहे, केंद्र सरकारने निर्बंधांबाबत पाठवलेल्या खलित्याची होळी करायची की, सुरनळी यावरही विरोधकांकडून मार्गदर्शन व्हावे.अण्णा हजारेंनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यामुळं बहुधा आपले देवही गोंधळले असतील. ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला असा हा प्रकार आहे असे म्हणत विरोधकांची खिल्ली उडविली आहे.
‘ माणूस जगला नाही, तर मंदिरं कायमचीच ओस पडतील असं भयानक चित्र करोनामुळे जगभरात निर्माण झालं आहे.ठाकरे सरकार हे हिंदूविरोधी असल्याचा प्रचार केला जातोय. सण, उत्सवांच्या बाबत ठाकरे सरकार कोरडं आहे. देवदेवळांचं सरकारला काहीच पडलेलं नाही, अशा प्रचारी पिचकाऱ्या मारल्या जात आहेत. पण त्या पिचकाऱ्या विरोधकांवरच उलटणार आहेत. विरोधकांचं डोकं ठिकाणावर असेल तर त्यांनी आपल्या राज्यातील जनतेचा विचार आधी केला पाहिजे..
भाजप,अण्णा हजारें त्यांच्याकडूनही मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले जात आहे. मंदिरे उघडली नाहीत तर या पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनाचा इशारा देत आहेत. शिवसेनेने आपल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून विरोधकांवर जोरदार निशाणा सुनावले आहे.
काल काही भागात निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी करण्याचं शौर्य महाराष्ट्रातल्या काही फुटकळ विरोधी पक्षांनी बजावलं आहे. हे पक्ष आज पूर्णपणे अस्तित्वहीन आणि निपचित झाले आहेत. लोकांनी त्यांना निवडणुकांत वारंवार जमीनदोस्त केले, पण विरोधासाठी विरोध या एकमेव अजेंड्यावर विरोधी पक्ष दोन-चार लोकांना एकत्र करून रस्त्यांवर हंड्या फोडत स्वतःचंच हसं करून घेत होता,’ अशी टोलेबाजी या लेखात केली आहे.