देशाचे संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश

0
166

देशाचे संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांचे चॉपर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे. तमिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कन्नुर भागात लष्कराचं हेलिकॉप्टर  बुधवारी क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे काही अधिकारी असल्याचं समजतं. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे

तमिळनाडू येथील उटीमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. उटी येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधून लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. त्यात सीडीएस बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपीन रावत यांच्यासह सैन्यदलातील जवळपास 14 जण प्रवास करत होते. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण रवाना झाले होते. अशातच हा अपघात झाला. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून या भीषण अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर अपघातस्थळावरून मृतांचे मृतदेह तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. जनरल बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय हवाई दलाने या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच तेथून जाणाऱ्या रस्त्यावर जाम सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सीडीएस बिपिन रावत यांनी बुधवारी सकाळीच दिल्लीहून सुलूरला जाण्यासाठी फ्लाइट घेतल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here