देशातील कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे दुसरा मृत्यू!

0
74

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटची लागण झालेल्या 73 वर्षीय व्यक्तीचा राजस्थानमधील उदयपूरमध्ये शुक्रवारी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 52 वर्षीय कोविड ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाचा 28 डिसेंबरला हृदयविकाराने मृत्यू झाला होता या रुग्णाने नायजेरियाचा प्रवास केला होता. त्याला 13 वर्षांपासून मधुमेह होता.

राजस्थानमधील रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाब व हायपोथायरॉईडीझमचा त्रास होता. 25 डिसेंबर रोजी त्यांच्या रिपोर्टमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट पॉझिटिव्ह असल्याचा   अहवाल मिळाला होता.त्यांचा मृत्यू पोस्ट-कोविड न्यूमोनियामुळे झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जी लक्षणे असतात तीच लक्षणे त्यांच्यात होती. ओमायक्रॉन बाधितांच्या बाबतीत राजस्थान देशात चौथ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here