नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा शनिवारी मुंबईतील बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा

0
100

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी मुंबईतील बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी एजन्सीने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या अटकेच्या एका दिवसानंतर ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने तपशीलवार माहिती न देता अरमान कोहलीच्या मुंबई येथील घरी छापेमारी सुरू असल्याचे सांगितले. अरमानने दुश्मन जमाना, बाजीगर, दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे या सारख्या बड्या सिनेमात अरमानने महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. याचबरोबर तो बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये देखील सहभागी झाला होता.

दरम्यान, मुंबईच्या एका कोर्टाने अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला 30 ऑगस्टपर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) कोठडी सुनावली आहे. NCB कडून विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी सांगितले की बंदी घातलेल्या औषधाशी संबंधित केस आहे आणि त्यामुळे दीक्षितची आणखी चौकशी करण्याची गरज आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाने अनेक अभिनेत्यांना आपल्या कचाट्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here