कोरोनाचा संसर्ग आणि सरकारने घालून दिलेले निर्बंध आणि नियम यांचे पूर्णपणे पालन करत यावर्षीही गणरायाला ठिकठिकाणी निरोप देण्यात आला. पुण्यातही मनाच्या सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन साधेपणाने करण्यात आले. पहिला गणपती कसबा गणपती,मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती,मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती,मानाच्या पाचव्या केसरी गणपती या सर्वांचे विसर्जन महामारीच्या संकटामुळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले.यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू झाला.मानाच्या पहिला गणपती कसाब गणपतीचे विसर्जन वेळेनुसार करण्यात आले.