पुण्यात एका बॅडमिंटन प्रशिक्षकाला अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी अटक

0
52
जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल केला हस्तगत
जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल केला हस्तगत

पुण्यात एका बॅडमिंटन प्रशिक्षकानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालेवाडी क्रिडा नगरीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडीली आहे.

संशयीत आरोपी प्रशिक्षकाचे वय 36 वर्षे आहे. त्याने कोचिंगसाठी येणाऱ्या पीडित मुलीला शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शटल बॉक्स जिममधील लॉकरमध्ये ठेवायला सांगितले. त्यानंतर तो तिच्या पाठीमागे गेला आणि पीडितेशी बोलायला सुरुवात केली. पीडितेची प्रशंसा करत शेकहॅन्ड करण्याचासाठी हात पुढे केला. प्रशिक्षकाच्या तोंडून कौतुक ऐकल्यानंतर पीडितेनंही शेकहॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला. परंतु त्याने तिला मिठीत घेतले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीनं कशीबशी स्वत:ची सुटका केली घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here