प्रभावी जनसंपर्कातून प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख करुन प्रशासनाची प्रतिमा उंचवावी- कोल्हापूर विभाग माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट

0
130

सिंधुदुर्ग– अधिस्वीकृती, शासनमान्य यादी, सन्मान योजना त्याचबरोबर पत्रकारांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही उपसंचालक डॉ. खराट यांनी दिली. प्रभावी जनसंपर्कातून प्रशासकीय  कामकाज लोकाभिमुख करुन प्रशासनाची प्रतिमा उंचवावी, असे मार्गदर्शन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी सांगितले.

उपसंचालक डॉ. खराट यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देवून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण, एकनाथ पोवार, दूरमुद्रणचालक रवींद्रकुमार चव्हाण, लिपीक-टंकलेखक संदीप राठोड, सर्वसाधारण सहाय्यक रवींद्र देवरे, रोनिओ ऑपरेटर अविनाश होडावडेकर, शिपाई महेंद्र भालेकर उपस्थित होते.

जिल्हा पत्रकार संघाला डॉ. खराट यांनी आज भेट देवून चर्चा केली. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी पुष्पगुच्छासह गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. खराट यांनी पत्रकारांसाठी असणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर यांनी शेवटी आभार मानले. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव नंदकुमार आयरे, जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव देवयानी ओरसकर, तसेच सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी दत्तप्रसाद वालावलकर, रवी गावडे, संदिप गावडे, विनोद दळवी, मनोज वारंग, शांताराम राऊत, छायाचित्रकार सतीश हरमळकर आदी उपस्थित होते.

उपसंचालक डॉ. खराट यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी,  ठाणे, मंत्रालय याठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. माहिती व जनसंपर्क विभागात समाज माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या संपादकाचे कामही त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. डॉ.खराट यांनी पत्रकारितेत पीएच. डी. केली असून त्यांची 25 पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here