फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय – अशोकराव जाधव

0
90

मंत्री अस्लम शेख यांना संगमेश्वर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रस्ताव !

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंट ची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस अतिवृष्टी वेळी पुराचे पाणी शेतामध्ये मोठया प्रमाणावर येते व शेतीचे जे नुकसान होते ते होणार नाही तसेच या सर्व खाडी किनाऱ्या लगतच्या गावांना छोटया छोट्या जेटी बांधल्यास मस्य पालन आणि पर्यटनास संधी मिळेलच व त्या बरोबर रोजगार ही ऊपलब्ध होयील . असे मत अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले

या बाबत काँग्रेसच्या वतीने खाडी पट्टातील पुर संरक्षण आणि रोजगारा करीता खाडीचा ऊपयोग या विषयावर आपली मते मांडताना व त्या दृष्टीने मंत्री मा अस्लम शेख यांना देणेसाठी प्रस्ताव तयार करताना मत मांडले होते या बाबत संगमेश्वर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने खाडी पट्टातील विकासा बाबत चर्चा झाली त्यात खालील बाबींचा विचार झाला . काही खाडी किनाऱ्यावरील गावांच्या लगत जी खाडी आहे त्यात गाळाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे खाडीच्या मुखा पासुन सुमारे दोन की , मी गावाकडील बाजूस गाळ साठून पुराच्या पाण्याचा धोका ही वाढत आहे .

त्यामुळे खाडी किनाऱ्याच्या गावांना संरक्षण भितींच्या डिझाईन मध्ये चेंजेस ( बदल ) करून जेटी कम संरक्षण भिंत कशी होयील ते पहावे असा प्रस्ताव मंत्री अस्लम शेख यांचे कडे संगमेश्वर तालुका काँग्रेसने अशोकराव जाधव जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष, प्रवक्ते आणि संस्थापक अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांचे नेतृत्वाखाली दत्ताजी परकार अध्यक्ष संगमेश्वर तालुका काँग्रेस, अब्बास आंबेडकर ऊपाध्यक्ष संगमेश्वर तालुका काँग्रेस , आणि दिलीप मोहीते माजी जिल्हा परिषद ऊमेदवार , बावा लांजेकर , संदीप वेल्हाळ तालुका काँग्रेस सरचिटणीस , काँग्रेसचे जेष्ठ नेते संदिप ( दादा ) सुर्वे , रमेश जी झगडे, कॅप्टन हनिफ खलफे , इलियास मापारी , अनित भुवड देवरुख शहर अध्यक्ष ,इलियास खान , किरण भोसले , बावा मेस्त्री, हरिशचंद्र देसाई , समीरा खान , गोणबरे, इत्यादी कार्यकर्त, पदाधिकारी ऊपस्थित होते .जेटीच्या मागणी मुळे खाडी पट्टातील लोकांनी काँग्रेसच्या कामा बद्यल समाधान व्यक्त केले व जनतेला आता काँग्रेसच आधार देवू शकते अशा प्रतिक्रीया सर्व सामान्यांनी दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here