बेळगाव महानगर पालिकेची ही निवडणूक 58 जागांसाठी होती.यामध्ये 358 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.भाजपने मिळवलेल्या यशानंतर राज्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांकडून फटाके आणि पेढे वाटप देखील केले जात आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर ‘लाज वाटायला पाहिजे, मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित केला आहे आणि जोरदार टीका केली आहे. तुमचा पक्ष जिंकलाय पण मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली 69 मराठी माणसांनी हौतात्म्य दिले आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या अस्मितेसाठी तुरंगात गेले आहे. परंतु, तुम्ही राज्यात पेढे वाटता लाट वाटायला पाहिजे. यासाठी मराठी माणूस कदापीही माफ करणार नाही’ असे संजय राऊत म्हणाले.
या निवडणुकीत एकीकरण समितीला मोठे यश मिळेल असे वाटत होते. परंतु, एकीकरण समितीला केवळ 3 जागा मिळाल्याने या पराभवामागे मोठे कारस्थान असल्याची शंका राऊतांनी यावेळी उपस्थित केली.