भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर… उपाध्यक्षांचा राजीनामा

0
97

भाजपमधली अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आशुतोष ठाकर यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. आशुतोष ठाकर यांनी राजीनामा पत्र ट्वीट केलं आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आपलं ट्वीट टॅग केलं आहे, त्यामुळे आता हे प्रकरण थेट पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचलं आहे. आशुतोष ठाकर यांनी आमदार अतुत भातखळकर यांच्यावर चुकीची वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.

आशुतोष ठाकर यांनी उपाध्यक्षपद आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आशुतोष ठाकर यांनी राजीनामा ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं आहे. ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, होय, माझ्यासाठी तुम्ही सर्वोच्च आहात. पक्षाशी माझी निष्ठा नेहमीच राहील. पण मी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आमदार अतुल भातखळकर जी यांच्या कार्यालयात आज जे घडले ते निंदनीय आहे!’, असं आशुतोष ठाकर यांनी राजीनामा पत्रात लिहिलं आहे.

एवढंच काय तर मी गुजराती आहे, म्हणून माझा अपमान केला काय, अशा सवाल देखील आशुतोष ठाकर यांनी मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना केला आहे. त्यामुळे मुंबई भाजपमध्ये गुजराती विरुद्ध मराठी अशी अंतर्गत गटबाजी सुरु झाल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आशुतोष ठाकर यांनी यांनी आमदार अतुल भातखळकर यांच्या चुकीच्या वागणुकीचाही आरोप केला आहे. आशुतोष हे जेव्हा भातखळकर यांच्या कार्यालयात गेले तेव्हा त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, हे सर्व त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here