मंगळवारीही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एका वर्षात सोनं तब्बल 10200 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, MCX वर 10 ग्रॅम सोन्याचे दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होतं. मंगळवारी ऑगस्ट फ्युचर्स MCX वर सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 46,001 रुपये आहे. तर चांदीच्या दरात 0.22 टक्के घसरण झाली आहे.
सोन्याचा दर 46,001 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 1 किलो चांदीची किंमत 60,503 रुपये आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा 50 हजारांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे