मनोरंजन: अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण, स्वत:ला केलं क्वारंटाईन

0
69
अभिनेता अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण, स्वत:ला केलं क्वारंटाईन

मुंबई- अभिनेता दोन दिवसांपासून अस्वस्थ होता, त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली. यामुळे अभिनेता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. अक्षयने स्वतःला वेगळे केले आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-हुमरमळा-रामेश्वर-मंदिरा/

याआधी अक्षय कुमारला दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. अक्षय कुमारला पहिल्यांदा 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 2022 मध्ये देखील अक्षयला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याने त्यावेळी त्याला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील सहभागी होता आले नव्हते.

सध्या अक्षय कुमार त्याच्या प्रोजेक्ट्सची शूटिंग करत आहे. त्याचा ‘सरफिरा’ हा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सरफिरा हा एक बायोपिक आहे, ज्यामध्ये जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यातील घटना दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अक्षय खूपच उत्सुक दिसत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त राधिका मर्चंट देखील मुख्य भूमिकेत आहे. सरफिरामध्ये सीमा बिस्वास, परेश रावल आणि जय उपाध्याय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here