मनोरंजन: फ्लीटगार्ड फिल्टर्स (FFPL) चा बालमधुमेह जनजागृतीसाठी ‘अभिलाषा’ या शॉर्टफिल्म ला पाठिंबा!

0
22
बालमधुमेह जनजागृतीसाठी ‘अभिलाषा’ या शॉर्टफिल्म ला पाठिंबा!
फ्लीटगार्ड फिल्टर्स (FFPL) चा बालमधुमेह जनजागृतीसाठी ‘अभिलाषा’ या शॉर्टफिल्म ला पाठिंबा!

शॉर्टफिल्म चे उदघाटन NFAI, पुणे येथे – मेधा कुलकर्णी (राज्यसभा सदस्य), संजय कुलकर्णी (अध्यक्ष – FFPL), बाला कृष्ण रेड्डी (संस्थापक- FITTR), डॉ. आश्विनी जोशी (वरिष्ठ मधुमेहतज्ञ), आणि अपर्णा पाणशीकर (संगीत दिग्दर्शक) यांचा प्रमुख उपस्थितीत केले गेले.

पुणे, २१ नोव्हेंबर २०२४: भारतात बालमधुमेहाच्या प्रकरणांची संख्या जागतिक स्तरावर सर्वोच्च आहे, हे एक चिंताजनक वास्तव आहे, यावर लक्ष देणे अति आवश्यक आहे. ‘अभिलाषा’ – बालमधुमेहावर जनजागृती पसरवणारी एक शॉर्टफिल्म चे पुण्यातील नेशनल फिल्म अर्काइव्ह (NFAI) मध्ये उदघाटन करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-हुमरमळा-येथील-बि-ए/

‘अभिलाषा’ शॉर्टफिल्म, FFPL च्या सहाय्याने, दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी तयार केली आहे, ही फिल्म बालमधुमेहाच्या वाढत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते. हे रोग मुख्यतः निष्क्रिय जीवनशैली, पालकांच्या व्यस्त दिनचर्यांमुळे, आणि आरोग्यास अपायकारक जीवनशैलीमुळे होतो.

‘अभिलाषा,’ मध्ये मॉर्डर्न जीवनशैलीचे आपल्या मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम दाखवले आहेत. विशेषतः, पालकांच्या व्यस्त दिनचर्यांमुळे मुलांचे दुर्लक्ष होणे, आणि मुलांचे डिजिटल गॅझेट्सवर वाढते अवलंबन यावर लक्ष केंद्रित केले आहे.

फ्लीटगार्ड फिल्टर्सचे अध्यक्ष-संजय कुलकर्णी, जे या फिल्म मध्ये डॉक्टरची भूमिका साकारतात, त्यांनी या फिल्मच्या उद्घाटनाच्या वेळी मुलांमध्ये चांगला आहार व व्यायामाची मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, “चांगला आहार आणि व्यायाम हे जीवनशैलीच्या रोगांना टाळण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. शिस्त घरातून सुरू होते, आणि पालकांनी नेहमीच आपल्या मुलांसाठी आदर्श व्हायला पाहिजे.”

FFPL ने विविध CSR उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची नेहमीच तयारी दर्शवली आहे. कंपनी मुख्यतः चार महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते: आरोग्य आणि सुरक्षा; शिक्षण आणि कला व संस्कृतीचा प्रचार; पर्यावरण आणि स्थानिक समुदाय व पायाभूत विकास; आणि सामाजिक न्याय. ‘अभिलाषा’ या उपक्रमास समर्थन देत, FFPL ने यावेळी समुदायातील आरोग्य व कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. FFPL च्या CSR उपक्रमांद्वारे, कंपनीने भारतातील अनेक लोकांना त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी मदत केली आहे. ‘आपल्या घरातूनच चांगले कार्य सुरू होतात,’ हा विश्वास ठेवून FFPL समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here