मनोरंजन: ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

0
39
'मिशन अयोध्या,
'मिशन अयोध्या' चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

 येत्या २३ जानेवारी (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!!

मुंबई: दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित – दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली.

https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

येत्या वर्षात २३ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक जाहीर होताच त्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या शीर्षकाने सर्वांच्या मनात कुतूहल चाळविलें असून अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदीराची रेखीव प्रतिमा या शीर्षक पोस्टरवर असून अयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीच्या प्रथम वर्षपूर्तीचे निमित्त साधून हा चित्रपट येत्या वर्षात २३ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे.

लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे  यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. समीर रमेश सुर्वे यांनी यापूर्वी व.पु. काळे यांच्या लोकप्रिय कादंबरीवरील ‘श्री पार्टनर’, ‘शुभलग्न सावधान’, ‘जजमेंट’ या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन दिग्दर्शन आणि ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’चे संवाद लेखन तसेच भोजपुरीतील ‘नचनिया’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. अत्यंत कल्पक आणि शिस्तबद्ध दिग्दर्शक म्हणून समीर हे चित्रपटसृष्टीत सुपरिचित आहेत. ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाची कथा रामभक्ती आणि अयोध्या या ऐतिहासिक संदर्भात गुंफलेली असल्याने चित्रपटाबद्दल जनमानसात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीशी संबंधित इतर सदस्यांची नावे अद्याप गुपित ठेवली गेली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार, याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “मिशन अयोध्या’ हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रामप्रेमाच्या आदर्शांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो., एक विशेष औचित्य साधून प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here