महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शाळा व खासगी शाळांना मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यासंबंधीचा नवीन जीआर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सोमवारी जारी केला. हा जीआर सर्व माध्यमांच्या शाळांमध्येही लागू राहणार आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गांना मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे.
पूर्वीच्या जीआर मध्ये मराठी विषय द्वितीय स्तर असा जर काढल्यामुळे सर्व शाळांनी मराठी विषयाकडे जास्त लक्ष दिले नव्हते.ते आता बदलून नव्या नियमाप्रमाणे राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमाच्या शासकीय व सर्व खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा झाला आहे. या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे.