महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासूनच अनुयायी मोठ्या संख्येने महामानवाला अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या चैत्यभूमीवर कोरोना बाबतच्या नियमांचे पालन केले जात आहे.याठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनुयायांसाठी पालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारची सुविधा तैनात करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीपार्कवर स्टॉल्स लावण्यास परवानगी देण्यात आली नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी घरीच बसून महामानवाला अभिवादन करावे असे आवाहन देखील करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहनिनीवरुन महापरिनिर्वाणदिनी सकाळी 7.45 ते 10 वाजेपर्यंत शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.50, 10.50, 11.50 आणि दुपारी 12.50 वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.