महाराष्ट्रातील स्टार्टअप्स व फ्रान्सच्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल क्रांती घडेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0
88

माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. आगामी काळात फ्रान्ससारख्या देशांकडून तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास राज्यात डिजिटल क्रांती घडेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

इंडो-फ्रान्स चेंबर्स ऑफ कॉमर्सची 44 वी सर्वसाधारण सभा मुंबईतील हॉटेल ताज येथे पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. देसाई बोलत होते.

यावेळी चेंबर्सच्या अध्यक्षपदी सुमीत आनंद यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल श्री.देसाई यांनी आनंद यांचे अभिनंदन केले.

उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, फ्रान्समधील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात स्थायिक असून देशाच्या व राज्याच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लावत आहेत. कोविड काळात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फ्रान्समधील कंपन्यांनी मोलाचा वाटा उचलला. सध्या माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप्सचे हब म्हणून महाराष्ट्र नावारुपास येत आहे. फ्रान्समधील तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रातील बदलांमुळे आगामी काळात महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिचे उद्दिष्ट पूर्ण करणारे पहिले राज्य ठरेल, असेही श्री. देसाई म्हणाले.

यावेळी फ्रान्सचे भारतातील दूतावास इमॅयुल लेअनिन यांनी दोन्ही देशांतील औद्योगिक, राजकीय संबधांबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here