सिंधुदुर्ग :अभिमन्यू वेंगुर्लेकर.
मालवण शहरातील मधील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी डाँ. कटेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मालवण नगरपरिषदेने सदर कंत्राटदारास नोटीस बजावली आहे.
गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रस्त्यावरील फाट्यावरती सुओ मोटो याचिका दाखल करून घेताना महत्वपूर्ण निकाल दिला की रस्त्यावरील खड्डेयांची तक्रार त्या शहरातील सर्वसामान्य नागरिकही सदर खात्याकडे करू शकतो. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दहा दिवसात कारवाई करण्यात आला नाही तर पोलीस विभागाने तीन दिवसात चौकशी करून सदर खात्याविरूध्द गुन्हा दाखल करावा. मुंबई उच्च न्यायालयाचा या निकालाचा हवाला देत मालवणमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी पडलेल्या खड्डयाबद्दल तसेच धोकादायक रस्त्याबद्दल मालवण नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम खाते येथे तक्रार दाखल केली होती. १० दिवसातही खड्ड्यांवर कारवाई न केल्याने आनंद हुले यांनी मुख्याधिकारी- मालवण नगरपरिषद तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांच्याविरुद्ध मालवण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभाग अभियंत्यांनी डि. आर. कन्स्ट्रक्शन कोल्हापूर व आशिष परब खोठले मालवण या दोन कंत्राटदारास नोटीस बजावली होती. नोटिसीमध्ये रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची ताकीद दिलेली आहे.
नोटिसीनंतर कंत्राटदारांनी खड्डे बुजवून हाँट मिक्सींगने मालवण ते नेरूरपार व मालवण ते कसालपर्यंतचा रस्ता दुरुस्त केला आहे. आनंद हुले यांनी स्वत दुरूस्तीची पाहणी करून रस्तादुरूस्तीबद्दल समाधान व्यक्त करीत उपविभाग अभियंत्यांविरूद्दची तक्रर मागे घेतली.मालवण नगर परिषदेने लेखी आश्वासन देऊनही रस्त्याची दुरूस्ती केली नाही तसेच अनधीकृत स्पीड ब्रेकरही हलवले नसल्याने ६ महिन्यानंतर आनंद हुले यांनी मालवण पोलिस स्टेशनला स्मरणपत्र दिले परंतु निरीक्षक- श्री ओटवणेकर यांनी कारवाई केली नाही त्यामुळे उपविभागीय पोलिस अधीकारी डाँ. कटेकर यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांच्या आदेशानुसार मालवण पोलिस स्टेशनमधील तपास अधीकारी टेंबुलकर यांनी मालवण मधील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल पोलीसांनी मालवण नगरपरिषदेस नोटीस बजावली आहे. या नोटीसीची दखल घेत मालवण नगर परिषदेने आनंद हुले यांना गणपतीपूर्वी खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.