रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघातर्फे जाहीर आवाहन

0
95

रत्नागिरी- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्‍हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील ज्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी गुणवत्ता पारितोषिके दिली जातात. यावर्षी देखील ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये ८० % पेक्षा जास्त व इयत्ता बारावी मध्ये ७५% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी संघाकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत.

त्याचप्रमाणे कर्‍हाडे ब्राह्मण ज्ञातीतील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी कर्‍हाडे ब्राह्मण संघात उपलब्ध असणाऱ्या विहीत नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे.

यासाठी रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघ, शेरेनाका- झाडगाव, रत्नागिरी, दूरध्वनी ०२३५२-२२४५७९ येथे संपर्क साधून १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज द्यावेत असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here