राज्यात दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी दिसू लागल्यावर कोरोनाचे अनेक निर्बंध सरकारने कमी केले. हळूहळू शाळा सुद्धा उघडण्यात आल्या.पण कोरोनाचा ओमिक्रोन हा नवीन विषाणू आफ्रिकेतून पसरत भारतात दाखल झाला आणि कोरोनाचे रुग्ण प्सापञाव वेग वाढत चालला आहे. मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे मुंबईमधील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही घोषणा केली आहे .