राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस

0
75

वेधशाळेने पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला असल्याचे सांगितले आहे .त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वळिवाचा पाऊस पडत आहे. कोल्हापूर भागात २ दिवसांपूर्वीच गारांचा पाऊसही झाला होता.

आता हवामानखात्याने राज्यात येणाऱ्या पाच दिवसातही अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर आणि जालना या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here